एक दिवस : एक विषय

*माझी शाळा : माझा उपक्रम*

*एक दिवस : एक विषय*

उच्च प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवी वर्गाना शिकविणे तसे खूप सोपे आहे. मात्र लहान प्राथमिक वर्गाना म्हणजे पहिली ते पाचवी वर्गाना शिकविताना अनेक कल्पना, आयडिया आणि उपक्रम तयार करून राबवावे लागतात, तेंव्हा कुठे मुले आपल्या शिकविण्याकडे लक्ष्य देतात. त्याचसोबत मुलांच्या पाठीवरील दप्तरांच्या ओझ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी काही तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. आज आपण मुलाना काय शिकविणार आहोत याचे नियोजन टाचण काढून तयार करतो. बहुतांश वेळा टाचण काढल्याप्रमाणे आपले शिकविणे होत नाही. उच्च प्राथमिक वर्गात तासिका आणि विषयानुसार शिकविणे शक्य आहे. मात्र प्राथमिक वर्गात ते शक्य नाही असे अनुभव वर्गात शिकविताना मला आला म्हणून मी त्यावर खालील प्रकारचा उपाय केला.

ते बरोबर आहे की चूक मला काही उमजत किंवा कळत नाही. मात्र या पद्धतिमुळे मुले दिवसभर त्याच विषयात मग्न झालेली दिसून आली. म्हणून हीच पध्दत मी वापरात आणली तर काही चुकीचे आहे काय ? याबाबत मार्गदर्शन करावे.

*वर्ग : चौथा*
असलेले मुख्य विषय : मराठी, गणित,  इंग्रजी , परिसर अभ्यास भाग 1 व 2

*सोमवार : मराठी*
*मंगळवार : गणित*
*बुधवार : इंग्रजी*
*गुरुवार : परिसर अभ्यास भाग 1*
*शुक्रवार : परिसर अभ्यास भाग 2*
*शनिवार : विना दप्तर शाळा*

सकाळच्या सत्रात पाठ अध्यापन आणि दुपारच्या सत्रात त्याच पाठावर हसत खेळत चर्चा आणि प्रश्नोत्तर

या पध्दतीने मुलांना अध्यापन करीत असताना मुले अणि मी दोघे ही एकाच प्रवाहात होतो.
विषयाची लिंक तुटली नाही आणि दिवसभर त्याच विषयी मुलासोबत चर्चा करता आली.
दफ्तराचे ओझे कमी होण्यास मदत मिळाली

लहान मुलांसाठी मला हा उपाय खुप छान वाटले. आपणास यात अजुन काही वाढ करता आले तर चांगलेच होईल

शब्दांकन : नासा येवतीकर

आपले मत अवश्य कळवा

Comments