*माझी शाळा - माझा उपक्रम*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली ता. बिलोली येथील *माझा वाढदिवस* उपक्रमाबद्दल माहिती
वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनात एक महत्वाचा दिवस असतो या दिवशी आपला पृथ्वी तलावर जन्म झालेला असतो. मोठ्या शहरात वाढदिवस खुप उत्साहात साजरी केली जाते. वाढदिवस साजरी करण्याची पद्धत हळूहळू ग्रामीण भागात सुध्दा येऊन पोहोचली आहे. आज खेडोपाडीसुध्दा वाढदिवस साजरा करण्याची पध्दत रूढ झाली आहे. हीच वाढदिवसाची पध्दत शाळेतून ही राबवावे, विद्यार्थ्यांना आपल्या वाढत्या वयाची जाण आणि जबाबदारी कळावी यासाठी *माझा वाढदिवस* या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली
*माझा वाढदिवस* या उपक्रमाची काही वैशिष्ट्ये -
* सर्वप्रथम शाळेतील सर्व मुलांची महिना निहाय वाढदिवसाचे जून ते एप्रिल पर्यन्त संकलन गोषवारा तयार करण्यात आले
* जूलै महिन्यातील वाढदिवसाची यादी दर्शनी भागावर लावण्यात आली
* त्यामुळे येता जाता त्यावर प्रत्येकाची नजर पडू लागेल आणि मुलांचा वाढदिवस चुकून राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल.
* ज्याचा वाढदिवस आहे त्या मुलास एक दिवस अगोदर सूचना देऊन त्यास दुसऱ्या दिवशी शाळेला येताना चांगला स्वच्छ ड्रेस परिधान करून येण्याची सूचना देण्यात येते.
* शाळेतील सर्वात वरचा वर्ग असलेल्या पाचवीतील मुलांना पुष्पगुच्छ तयार करून आणण्याची जबाबदारी दिली जाते त्यानुसार ते पुष्प गुच्छ तयार करतात
* वाढदिवस असणाऱ्या मुलास शाळेकडून एक वही आणि एक पेन भेंट म्हणून दिली जाते त्यासाठी वर्षभरातील खर्चाची गोळाबेरीज एकदाच करून शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच आणि इतर सदस्याकडून लोकवर्गणी जमा केली जाते
* या उपक्रममुळे मुलांमध्ये एक वेगळा उत्साह आणि आनंद दिसून येतो वाढदिवस घरी तर साजरी होत नाही मात्र शाळेत साजरी केल्यामुळे विद्यार्थी शाळेचे आभार मानतात
* शाळेत मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी हा उपक्रम मोलाची कामगिरी करतो.
* एखाद्या मुलाचा सुट्टीच्या दिवशी वाढदिवस आल्यास दुसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो
* वाढदिवसाच्या निमित्ताने मुलाना स्वच्छता आणि नियमित अभ्यास करण्याची शपथ दिली जाते
* माझा वाढदिवस कधी एकदा येतो अशी प्रतीक्षा सर्व मुलाना लागून राहते
* मित्रासोबत साजरा केलेला वाढदिवस संस्मरणीय असतो आणि मुलाच्या जीवनात हा क्षण वेगळाच रंग भरतो जे जीवन विकासासाठी आवश्यक आहे.
आमचा हा उपक्रम आपणास कसा वाटला ?
आपल्या कडू गोड प्रतिक्रिया जरूर कळवा.
धन्यवाद

Comments
Post a Comment