*माझी शाळा - माझा उपक्रम*
*चिरलीत मीना बँकेची सुरुवात*
बिलोली तालुक्यातील कुंडलवाड़ी केंद्रातील प्राथमिक शाळा चिरली येथे कृषी दिनानिमित्त *मीना बँकेची* सुरुवात करण्यात आली. हातात पैसे पडले की मुलांचे पाय आपोआप दुकानाकडे वळतात. पेन किंवा वहीची गरज भासली की आई बाबाकडे हात पसरण्याची वेळ येते. तेच जर आपण आपल्याजवळ आलेला पैसा खर्च न करता बचत केल्यास कोणत्याही वेळेला आपणास हवी ती वस्तु मिळविता येईल. मुलांना बचतीची सवय लागावी आणि गरज पडेल तेंव्हा त्यांची बचत त्यांना मदत कशी पडेल हे ही कळावे यासाठी मीना बँक सुरुवात करण्यात आली असे नासा येवतीकर यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. बचतीचे महत्त्व मुलांना पटले त्यामुळे पहिल्याच दिवशी पंचवीस रुपये जमा करण्यात मीना बँक यशस्वी झाली. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक आय. एच. झंपलकर आणि जे.पी. दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती

Comments
Post a Comment