गणित किती सोपे

1⃣2⃣3⃣4⃣5⃣6⃣7⃣

*उपक्रम : गणित किती सोपे*

गणित म्हटले की बऱ्याच जनाच्या कपाळावर आठे पडतात. शालेय जीवनात गणित विषय नकोसा वाटतो कारण या गणितात अगदी छोटी चुकीमुळे संपूर्ण गणित चुकते बिन हातच्याची बेरीज आणि वजाबाकी एवढं आवडीने करावेसे वाटते त्यापुढे हातच्याची बेरीज आणि वजाबाक़ी म्हटले हातचा किंवा काही तरी लक्षात राहत नाही आणि गणित चुकते गुणाकार म्हटले की पाढा माहित असला पाहिजे जेमतेम 5 पर्यन्तचा पाढा चांगल्या पद्धतीने जमतो आणि त्यानंतर मात्र गुणाकार नकोसा वाटतो भागाकार तर त्याचे नाव जरी उच्चारले तर मुले नको म्हणतात पण वास्तविक पाहता मुलांना या गणिती क्रिया हसत खेळत शिकविले आणि रोज सराव घेतला तर मुले गणितापासून दूर पळण्याऐवजी आवडीने गणित करतील आणि जीवनात कधीही गणित अवघड आहे किंवा कठीण आहे असे म्हणणार नाहीत त्यासाठी खालील उपक्रम नक्कीच काम करून जातो

उपक्रमाचे नाव : गणित किती सोपे
वर्ग : पाचवा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड

कृती :
* मुलांना कोणत्याही त्यांच्या मनावर सात अंकी ( दश लक्ष पर्यन्त ) दोन संख्या तयार करण्यास सांगणे
* संख्या अंकात लिहा
* संख्येचे स्थान व किंमत लिहिणे
* संख्येचे विस्तारित रूप लिहा
* संख्येतील लहानमोठेपणा ठरवा
* बेरीज करा
* वजाबाकी करा ( मोठी संख्या लक्षात घेऊन ती वरच्या बाजूला व लहान संख्या खाली लिहिणे )
* गुणाकार करा ( हजार पर्यन्तच्या संख्येला शतक पर्यन्त संख्येने )
* भागाकार करा ( हजार पर्यन्तच्या संख्येला दशक पर्यन्त संख्येने )

* एकमेकांच्या वह्या तपासुन घ्या
* काही समस्या असेल किंवा वही तपासतना कळत नसेल तर विषय शिक्षकाची मदत घ्या

* हा उपक्रम गटात सुद्धा घेता येईल
* संख्या तयार करतेवेळी गुडगुडी चा वापर केल्यास अति उत्तम

5⃣4⃣7⃣6⃣2⃣1⃣3⃣

*संकल्पना : नासा येवतीकर , गणित शिक्षक*
09423625769

6⃣7⃣5⃣4⃣1⃣2⃣3⃣

Comments