नेम प्लेट

*माझी शाळा माझा उपक्रम*

*उपक्रम : माझे नाव ( माय नेम प्लेट )*
*शिक्षकाचे नाव : जे. पी. दिंडे*
*वर्ग : पहिला*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली*
*तालुका बिलोली जिल्हा नांदेड*
==========**********==========
पहिल्या वर्गात प्रवेश करून शाळेत येणारा सहा वर्षाचा विद्यार्थी जरासा घाबरलेला आणि गोंधळलेला असतो आपल्या आई आणि वडिलांना सोडून तो पहिल्यांदाच दूर राहिलेला असतो त्यामुळे त्याच्या मनात शाळेविषयी भीती राहते ते फक्त काही दिवस कारण जसे जसे त्याला शाळा आणि शिकण्याची गोडी लागते तसे तसे तो शाळेत नियमित येऊ लागतो याठिकाणी पहिल्या वर्गाला शिकविण्यासाठी मातेच्या काळजाची शिक्षक असणे आवश्यक आहे
पहिल्या वर्गाला शिकविणारे शिक्षक रागीट आणि लहान मुलांना समजून घेणारे नसतील तर मुले पहिल्या दिवसापासून घाबरलेली जे असतात ते पुढे ही त्याच अवस्थेत असतात आणि पुढे किती ही प्रयत्न केले तरी ते प्रतिसाद देत नाहीत एका वेळी वरच्या वर्गात शिकविणे सोपे आहे मात्र पहिल्या वर्गास शिकविणे वाटते तेवढे सोपे नाही बहुतांश शिक्षकांना पहिल्या वर्गास शिकविता येत नाही हे वास्तव आहे महाविद्यालयातील मुलांना शिकविणारे प्राध्यापक पहिल्या वर्गाच्या मुलांना शिकवू शकतील काय ? याबाबत शंकाच आहे
पण इकडे जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या वर्गास अध्यापन करणारे शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांना शाळेत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत आज आपण असाच एक उपक्रम जाणुन घेऊ या
मूल शाळेत टाकताना सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो *तुझे नाव काय* आणि काही मूल उत्तर देताना घाबरतात तर काही चटकन उत्तर देतात त्याचा शाळेतील शिक्षणाचा प्रवास येथून सुरु होतो वर्गात आलेल्या मुलात शाळेची भीती दूर व्हावी आणि शाळेविषयी आकर्षण निर्माण होण्यासाठी *माझे नाव किंवा माय नेम प्लेट* नावाचा उपक्रम सुरु करण्यात आला
==========**********==========
*उपक्रमाची सुरुवात मुलांना *तुझे नाव काय* या प्रश्ना पासून करण्यात आली
*मुले आपली नावे पटापट सांगू लागली
*त्याच्या खिशाच्या आकाराची प्रत्येक मुलांची नेम प्लेट तयार करण्यात आली
*पुनश्च तोच प्रश्न *तुझे नाव काय* हा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर नेम प्लेटच्या स्वरुपात वर्गात दाखवण्यातआणि त्या संबधित विद्यार्थ्याच्या खिशाला लावण्यात आले
*विद्यार्थी मध्यांतरमध्ये वर्गाबाहेर गेल्या वर सर्वाना सांगू लागले *हे पहा माझे नाव*
*वर्गशिक्षकाला आपल्या वर्गातील सर्व मुलांची नावे माहित असतात मात्र त्याच शाळेतील इतर शिक्षक त्यास प्रत्येक वेळी विचारतात *तुझे नाव काय* मात्र नेम प्लेट ती समस्या सोडविली
*त्याच्या खिशावरील नेम प्लेट पाहून शाळेतील मुख्याध्यापक, इतर शिक्षक आणि विद्यार्थी त्यास नावाने हाक मारू लागली
*प्रत्यक्ष नावाने हाक मारल्यामुळे मुलांना छान वाटत होते
*शाळा सुटली की आपली नेम प्लेट काढून ट्रे मध्ये परत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी परत आपलीच नेम प्लेट उचलयाची आणि मित्राच्या मदतीने खिशाला लावून घेऊ लागली
*आवडत्या मित्राच्या नावाची नेम प्लेट उचलायला सांगून इतर शब्दाची ओळख देता येऊ लागले
*पुढे विद्यार्थी आपले नाव लिहिण्याचा प्रयत्न ही करतील आणि सर्व विद्यार्थी आपले नाव लिहू शकतील.
==========**********==========
हा उपक्रम आपणास कसा वाटला ? जरूर कळवा
धन्यवाद
==========**********==========
          *शब्दांकन : नासा येवतीकर*

Comments

  1. अनुकरणीय उपक्रम☺
    असेच शेयर करीत रहा म्हणजे आम्हालासुद्धा आमच्या शाळेत असे उपक्रम राबविण्यास मदत होईल.

    ReplyDelete
  2. अनुकरणीय उपक्रम☺
    असेच शेयर करीत रहा म्हणजे आम्हालासुद्धा आमच्या शाळेत असे उपक्रम राबविण्यास मदत होईल.

    ReplyDelete

Post a Comment