*मीना बचत बँकेचे पासबुक वितरण*
मीना बचत बँक प्रारंभ करून आज दीड महिन्याचा कालावधी संपला मुलांना आत्ता पैसे बचत करण्याची चांगली सवय लागली काही मुले नियमितपणे पैसे जमा करू लागली तर काही मुले दीर्घ कालावधी नंतर या सर्व मुलांना बचत करण्याची सवय लावणे अत्यंत महत्वाचे आहे काही तरी युक्ती शोधणे गरजेचे होते विचार चक्र चालू होते
शाळेतील एक विद्यार्थी बँक सुरु झाल्यापासून तर आजपर्यन्त रोज बचत केलेली आहे आणि त्याचा ठरलेले वाक्य " सर, माझे किती पैसे झाले ?" आज ही त्याने पैसे दिले आणि मी त्याची माझ्या रजिस्टर ला नोंद घेतली की त्याचा प्रश्न पडला " सर, माझे किती पैसे झाले ?" मी लगेच त्याला त्याच्या खात्यावर जमा असलेली रक्कम सांगितली आणि वर्गात गेलो वर्गात सुध्दा दोन तीन विद्यार्थी " सर, माझे किती पैसे झाले ?" असा प्रश्न टाकले तेंव्हा मला एक कल्पना सुचली की यांना आपण पास बुक दिले तर............
मी लगेच कामाला लागलो. वही चे कागद आणि वर कोरा पेपर लावून त्यांचे पास बुक प्रायोगिक तत्वावर दोन चार तयार करण्यात आले त्यास वर *मीना बचत बँक विद्यार्थ्याचे नाव, वर्ग, क्रमांक आणि शाळेचे नाव* लिहून त्यात त्यांच्या बचतीची नोंद करून मुलांना दिली तेंव्हा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पासबुक बघून प्रत्येक जन त्याची मागणी करू लागला तेंव्हा एक अट निर्माण करण्यात आली कमीत कमी ज्याचे पाच रु यात शिल्लक असतील त्यानाच हे पासबुक मिळेल असे म्हटल्यामुळे मुलांनी आपल्या खात्यात पाच रु जमा करण्यासाठी रोज प्रयत्न करू लागले आणि ज्याच्या बचत खात्यात पाच रु आहेत त्यांना पासबुक देणे आवश्यक झाले आहे
मुलांना बचत करण्याची सवय लागली त्याच सोबत वही किंवा पेन साठी आई बाबा कडे हात पसरण्याची वेळ आली नाही पेन आणि वही याच बचत बँकेतून मुलांना मिळत आहेत त्यामुळे मला लिहायला पेन किंवा वही नाही असे म्हणणाऱ्याची संख्या खुप कमी झाली दुपारच्या जेवणा सोबत बरीच मुले दुकानातील वस्तु आणून खात असत त्याचे देखील प्रमाण कमी झाले हातात पैसा आले की दुकानाकडे वळणारे पाय आत्ता सर येइपर्यन्त वाट पाहत आहेत
*थेबे थेबे तळे साचे* या म्हणी चा खरा अर्थ मुलांना या उपक्रमातुन नक्की कळून येईल आणि या बचतीचा फायदा भावी आयुष्य जगताना होईल यात शंका नाही
*शब्दांकन : नासा येवतीकर*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली*

Comments
Post a Comment