उपक्रमाचे नाव : आजचा मराठी शब्द
वर्ग : दूसरी ते पाचवी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता बिलोली जि नांदेड
======================================
मराठी महाराष्ट्राची राजभाषा आहे. आपल्या सर्वाची ती मातृभाषा आहे. मात्र दर कोसावर भाषा बदलत असते.त्यानुसार प्रत्येक विभागा नुसार आपली मराठी भाषा बदलत जाते. विदर्भात वेगळ्याच प्रकारे बोलले जाते तर कोकणात वेगळे बोलले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील भाषा वेगळी तर मराठवाड्यातील बोलेलेली भाषा कुठे ही ओळखु येते अशी. त्यातल्या त्यात सीमावर्ती भागातील लोकांच्या भाषेवर त्या प्रदेशातील भाषाचा प्रभाव दिसून येतो. जसे की मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काही तालुक्याच्या सीमा तेलंगण आणि कर्नाटक राज्याशी जोडले असल्यामुळे तेलगु आणि कानडी भाषेचा शिरकाव मराठी बोलताना होतो. त्यामुळे बरेच मराठी माणस यांच्या बोलण्याकडे कान टवकारून ऐकतात. पुण्याची भाषा ही मराठी साठी प्रमाण भाषा म्हणून गृहीत धरली जाते. मात्र सर्वंना ती भाषा जमतेच असे नाही. त्यामुळे वाचन आणि लेखन करीत असताना असंख्य चूका होतात. त्यातल्या त्यात मराठी भाषा खुपच लवचिक असून वाक्यानुसार शब्दाचे अर्थ बदलतात. चिमणी झाडावर बसली आणि लग्नात वर वधू उभे राहिले या दोन वाक्यात आलेला वर शब्द वाक्याच्या अर्थानुसार बदलत असतो. या व्यतिरिक्त काही शब्द लिहिताना व्याकरण तर लक्ष्यात घ्यावेच लागते शिवाय त्या शब्दाची मूळ ओळख मुलांना करून देणे आवश्यक आहे. लहान मुलांना व्याकरण शिकवित बसलो तर त्याची अवस्था धोबी का कुत्ता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी अगदी लहानपणापासून मुलांना मराठी शब्दाची ओळख जर देत आलोत तर त्यांना व्याकरण सहज रित्या समजायला लागेल.
एकदा असे सहजच स्टेट बैंक ऑफ़ हैद्राबाद मध्ये जाण्याचा योग आला. बँकेत प्रवेश केल्याबरोबर एक दर्शनी भाग दिसला ज्यवार एक हिंदी शब्द जो की बँकेच्या व्यवहारात नेहमी वापरले जाते ते लिहून ठेवण्यात आले होते. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि मी ते शब्द का लिहिण्यात आले, हे तेथील शाखा व्यवस्थापकाना विचारले, तेंव्हा त्यांनी म्हटले की हे आमच्या व्यवहारात वापरले जाणारे शब्द असून आमचे कर्मचारी लिहिताना चूका करू नये म्हणून असे आम्ही रोज एक नविन शब्द लिहितो. मग मी विचार केला आपले विद्यार्थी सुध्दा मराठी लेखनात खुप चूका करतात तेंव्हा त्याची मराठी लेखन आपणास सुधारता येईल काय याचा विचार करीत *आजचा मराठी शब्द* या उपक्रमाचा जन्म झाला शाळेला सुरु झाल्यापासुन आजपर्यन्त म्हणजे जवळपास 60 शब्दांची ओळख मुलांना झाली आहे.
शब्दाची ओळख मुलांना दृश्य स्वरुपात झाल्यास ते नेहमी साठी लक्षात राहतात. त्यासाठी परिपाठ च्या वेळी मुलांना दिनविशेष सुविचार यासोबत आजचा मराठी शब्द सांगायचं आणि दर्शनी भागावर मोठ्या ठळक अक्षरात दिवसभर सर्वाना येता जाता दिसेल असे लिहून ठेवायचे यामुळे मुलांचे त्याकडे नेहमी लक्ष जाईल आणि तो शब्द पाठ म्हणता येणार नाही तर तो त्याच्या स्मरणात राहील जेंव्हा केंव्हा सदरील शब्द लिहिन्याची वेळ येईल त्यावेळी त्याला निश्चितपणे शब्द आठवेल आणि मराठी लेखनातील चूका कमी करता येतील यासाठी शक्यतो आपणास वारंवार बुचकळ्यात टाकणारी उकार , इकार आणि जोडाक्षर असलेले शब्द यात निवड केल्यास बराच फायदा मिळतो त्या शब्दाचे एक पान लेखन करून घेतले तर त्या मुलाचे लेखन कौशल्य सुध्दा सुधारणा होऊ शकेल
हा उपक्रम आपणास कसा वाटला ? आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद

Khup chan sir
ReplyDeleteKhup chan sir
ReplyDelete