उपक्रम :- वर्तुळात चिठ्ठी फिरवा
वर्ग :- तीसरा
विषय :- मराठी
विद्यार्थी संख्या : 16
विषय :- मराठी
विद्यार्थी संख्या : 16
*उपक्रमाची कृती*-
रोज पाच वाक्य या नियमाने पाठातील पाच वाक्ये मुलांना फलक वर लिहून त्यांच्या कडून वाचन लेखन करुन घ्यावे. सदरील पाच वाक्य समजून सांगावे. त्यावर आधारित छोटे-छोटे प्रश्न विचारावे. तीच प्रश्न एका प्रश्न पट्टीवर मार्कर पेनने वरील बाजूस प्रश्न आणि खालील बाजूस त्या प्रश्नाचे उत्तर लिहावे. वर्गातील विद्यार्थी एवढे प्रश्न पट्टी तयार झाल्यावर मग या उपक्रमास प्रारंभ करता येईल.
सर्वप्रथम मुलांना त्यांच्या हजेरी क्रमांकनुसार वर्तुळात बसवावे.
सर्व मुलांच्या हातात एक-एक प्रश्न पट्टी द्यावे.
वही वर प्रश्न क्रमांक टाकत लिहित चला असा आदेश द्यावा.
प्रश्न लिहिणे झाल्यावर उजव्या हातात प्रश्न पट्टी घेऊन हात ऊंच करण्यास सांगावे.
ज्याचे उजवा हात वर असेल त्याचे लिहिणे झाले असे समजायचे.
वर्तुळातील सर्व मुलांचे उजवे हात वर झाले म्हणजे सर्वाचे लिहिणे पूर्ण झाले.
त्यानंतर उजव्या हाताने द्या आणि डाव्या हाताने घ्या असा आदेश द्यावा.
म्हणजे लिहिलेली प्रश्न पट्टी उजवीकडे जाईल आणि डावीकडील प्रश्न पट्टी त्याला मिळत राहिल.
अश्या पध्दतीने मुले वर्तुळात जितकी असतील तितके प्रश्न उत्तर लिहितील.

*उपक्रमाचे फायदे* -
1) मुलांना प्रश्न आणि उत्तराची ओळख होईल
2) विचारलेल्या प्रश्नांची सहजपणे उत्तरे देतील
त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
3) प्रश्न उत्तरे कसे लिहावे याची ओळख होईल.
4) मुले इतरांना प्रश्न विचारू शकतील.
5) लेखनाची गती वाढेल.
6) पाठ योग्य प्रकारे समजून येईल.
7) एकमेकाची लेखन गति समजून घेतील.
8) बहुवर्ग अध्यापन पध्दतीसाठी अत्यंत उपयुक्त.
9) मुले गोंधळ न करता आपापले काम करीत राहतील.

*टीप - प्रश्नपट्टी च्या ऐवजी शब्दपट्टी, वाक्यपट्टी किंवा इंग्रजी शब्द यासारखे विविध पट्टी वापरता येऊ शकेल.*
शब्दांकन :- नासा येवतीकर,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
संकुल :- कुंडलवाडी
ता. बिलोली जि. नांदेड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
संकुल :- कुंडलवाडी
ता. बिलोली जि. नांदेड

Comments
Post a Comment