*वाढदिवसानिमित्त शालेय मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत खाऊ वाटप*
कुंडलवाडी केंद्रान्तर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथील शाळेत आज शालेय पोषण आहार योजना अंतर्गत दुपारच्या मध्यान्ह भोजनाच्या वेळी मुलाना खाऊ वाटप करण्यात आले.
प्रस्तुत शाळेवरील प्राथमिक शिक्षक नासा येवतीकर यांनी त्यांच्या मुलाचा आज ( 29 सप्टेंबर ) रोजी बारावा वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय पोषण आहार योजना अंतर्गत दुपारच्या मध्यान्ह भोजनाच्या वेळी मुलाना खाऊ वाटप करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव भोजराज यांनी स्वागत केले. शाळेतील शिक्षक इरेश्याम झंपलकर, जगन्नाथ दिंडे आणि शालेय पोषण आहार वितरक सौ. बानुबाई राजुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
=================================

मी मुलांच्या अनपेक्षित अश्या दिलेल्या गिफ्टने अचंबुन गेलो. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त मी आपणास काही तरी गोड खाऊ देणार असल्याची बातमी मुलांना दिली. शाळेत आम्ही *माझा वाढदिवस* ह्या उपक्रमात ज्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस असेल त्यांना एक वही एक पेन शाळेकडून दिल्या जाते. याच गोष्टीची आठवण ठेवून मुलांनी आज मला आश्चर्यचकित केले. माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मुलांनी शाळेत माझा फूल, पेन, वही आणि बिस्किटचा पुडा भेट देऊन स्वागत केले. खरोखरच मुले काही गोष्टी बारकाईने निरीक्षण करतात आणि त्याचे अवलंबन ही करतात, हे मात्र खरे आहे.
धन्यवाद सर्व माझे सोबती आणि विद्यार्थी .
Comments
Post a Comment