निकष क्र. 22 कविता करणे

🏃🏻 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*  🏃🏻

📚👫 *कविता करणे* 👫📚
*निकष क्र. 22 - बोनस*

विद्यार्थ्यास वर्गानुकूल 3 सोपे शब्द दिल्यास त्यापासून कोणतीही चार ओळीची कविता तयार करता येणे.

कविता करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी स्वतः जवळ प्रतिभा असावी लागते. मात्र एखाद्या वेळी कविता कशी करावी याचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगले काव्य आणि कवी तयार होऊ शकतात. थोडेसे डोळस दृष्टिकोन ठेवून वर्गातील मुलांना समजावून सांगितले की कविता कशी तयार होते ? मुले हळूहळू कवितेच्या ओळी लिहू शकतात. तसा अध्ययन अनुभव मुलांना देणे आवश्यक आहे. म्हणून आज मुलांना कविता कशी करावी या विषयी माहिती दिली.
•••••••••••••••••••••••••••••••••••
*कृती -*
1) शब्दाच्या शेवटी ळा हे अक्षर येणारे शब्द लिहा उदा. शाळा

2) प्रत्येक शब्द शेवटी असेल असे वाक्य तयार करा. उदा. ही माझी सुंदर शाळा.

3) चार वाक्य एकाच विषयी संबंधित असेल असे वाक्य एकत्र करा

4) अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी वाक्यात थोडा बदल करू या मात्र शेवटचा शब्दाचा शेवटी ळा असावा म्हणजे कविता पूर्ण होईल.

5) पाहू आत्ता शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यानी कविता कशी तयार केली ?

ही माझी सुंदर शाळा
तेथे मुले झाली गोळा
शाळेत आहे मोठा फळा
त्याचा रंग आहे काळा

अजुन भरपूर कविता मुलांनी केल्या आहेत ते खालीलप्रमाणे
*शेवटचे अक्षर र  न  य  असेल*

हे आहे दुकान
तेथे मिळते सामान
गोळ्या बिस्कीट ख्यायला
मिळतात छान छान
•••••••••••••••••••••••••••••••••••
मला आहेत दोन कान
त्याने ऐकतो छान छान
ऐकून मला मिळते ज्ञान
दूर होते माझे अज्ञान
•••••••••••••••••••••••••••••••••••
झाडाला असे भरपूर पान
फुले आहेत छान छान
गोड फळे पाहून
आनंदी होतो खाऊन
•••••••••••••••••••••••••••••••••••
रेणुकादेवीचे घर आहे माहूर
माझ्या घरापासून आहे दूर
चालत जावे लागते शिखरावर
चालून चालून दम येतो फार
•••••••••••••••••••••••••••••••••••
ही माझी कपिला गाय
तिला आहेत चार पाय
दूध देण्याची तिची सवय
मला मिळते दुधावरची साय
•••••••••••••••••••••••••••••••••••

या प्रयत्नाने मुले खुप आनंदी झाली.

     ⌨ *शब्दांकन* ⌨
- ना. सा. येवतीकर, सहशिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिरली

Comments