उपक्रम एक दिवसाचा

🕯उपक्रम एक दिवसाचा -

*वर्गातील खोडकर मुलांवर उपाय*

🎈मुलांना जर एखादे काम करायचे नसेल तर ते वेगवेगळे सोंग करतात, काही तरी बहाणे शोधतात. असाच तिसऱ्या वर्गातील एक विद्यार्थी, त्यास लिहिता येते, वाचन करता येते, गणिती क्रिया येतात. मात्र त्याला ते सर्व करण्याचा जाम कंटाळा. पाच वाक्य लिहून दाखवा, वाचून दाखवा म्हटले की कधी पेन नाही म्हणायचा तर कधी वही किंवा पुस्तक नाही असे म्हणायचा. कधी कधी मी करणार नाही नेहमी याच मूड मध्ये असायचा. यावर काही तरी उपाययोजना केली पाहिजे म्हणून शिक्षकाने प्रथम त्या खोडकर मुलाची वर्गनायक पदी नेमणुक केली आणि सर्व वर्ग त्याच्यावर सोपविला. ते काम तो नेटाने पूर्ण करीत होता. मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष चालूच होते. मग यावर शिक्षकांस एक युक्ती सुचली. शिक्षक त्याच्या कडून फलक लेखन करून घेऊ लागले

🎈शाळेची सुरुवात आजचा मराठी शब्द या उपक्रमाने होत असे तेच शब्द फलकावर लिहायचे काम तो वर्गात करू लागला.

🎈त्यानंतर शिक्षक काही निवडक पुस्तकातील पाच वाक्ये सांगत तेच वर्गातील फलकावर तोच लिहू लागला.

🎈लिहिलेल्या वाक्याचे वाचन सर्व मुलांकडून घेताना मुले जे जे शब्द चुकतात ते सांगण्याची जबाबदारी त्याच्यावर पडली.

🎈गणिती क्रिया मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, आणि भागाकार यांच्या प्रत्येकी पाच उदाहरणाची मांडणी करायची आणि उत्तरे लिहिण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली.

🎈त्याचे उत्तर चुकले की शिक्षकांच्या अगोदर मुलेच त्याला उत्तर चुकले असे म्हणू लागली. मग उत्तर कुठे चुकले याचा शोध घेऊन दुरुस्त केल्या जाऊ लागले.

🎈उत्तर बरोबर असले की शिक्षक मुलांना सांगत की , फलकावरील उत्तर आपल्या वहीत असेल तर त्यास बरोबर करा.

🎈वर्गात सर्वात जास्त गोंधळ किंवा गडबड करणाऱ्या मुलास दिवसभर व्यस्त ठेवण्यात शिक्षकांना यश मिळाले. त्याचा अभ्यास झाला आणि शिक्षकाचे समाधान ही झाले.

🎈अश्या प्रकारे वर्गातील खोडकर मुलांवर उपाय योजना झाली. मी करणार नाही असे बोलणारा विद्यार्थी *सर मी आत्ता काय करू ?* असे बोलू लागला. 

🎁 सायंकाळी त्या खोडकर मुलास ती शिक्षा वाटली नाही त्याचा चेहरा खुप आनंदी झाला. वर्गातील दुसरे मुले ही दिवसभराची जबाबदारी घेण्यास पुढे येऊ लागली. म्हणजे येथे रोज स्वयंशासन दिन चालू झाले.

*शब्दांकन :- ना. सा.*

उपक्रम आवडल्यास नक्की share करा

Comments