समृद्ध अनुभव -
•••••••••••••••••••••••••••••••••••
*लहान वयातील समजूतदारपणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••
शाळेची घंटा वाजली. शाळा सुटली तसे सारे मुले एकच कल्लोळ करीत बाहेर पडली. पाहता पाहता किलबिल किलबिल आवाजाने गजबजलेला शाळा परिसर एकदम शांत झाला. वरच्या वर्गातील एक-दोन मुले शिक्षकांस वर्ग बंद करण्यात मदत करीत होती. शाळेच्या व्हरांड्यात दुसऱ्या वर्गातील मुलगी आपले दप्तर उघडून बसली होती. मला आश्चर्य वाटले की ही मुलगी शाळा सुटल्यावर घरी न जाता इथे का बसली असेल ? न राहवता तिला विचारले की,
" तू घरी जाणार नाही काय ..? "
" जाते ना, थोडं वेळ थांबुन "
" कसे काय... ? "
" घरी कोणीच नाहीत....."
" आई बाबा कुठे गेलेत....? "
" ते कामाला जातात रोज. "
" किती वाजता येतात .....? "
" रात्री अंधार पडल्यावर येतात..."
" तू तोपर्यंत कुठे राहतीस .....?"
" माझ्याच घरी ..."
" एकटी राहतीस ...."
" हो....."
" काय काय करतीस एवढा वेळ....? "
" शाळेतून घरी जाते, घर झाडून काढते, भांडे धुते, आणि आई येईपर्यंत भात करून ठेवते..."
" भाकरी किंवा पोळी करत नाही काय ...?"
" मला करता येत नाही..."
" भाजी करता येते काय ...?"
" हो, वरण करता येते, परंतु आई करू देत नाही..."
" तुला भीती वाटत नाही काय एकटीला...?"
" नाही, कश्याची ही भीती वाटत नाही...."
" रात्री ला आई-बाबा आले नाही तर कशी करतेस ...? "
" येतातच,......."
" आई घरी आल्यावर काय करते....?"
" आई घरी आल्यावर पोेळी किंवा भाकरी करते. मग वरण करते. आम्ही सर्व एकत्र बसून जेवतो आणि झोपी जातो...."
तिच्या सोबत एक - दोन मिनीटात एवढा संवाद केला तेंव्हा मला तिचे कौतुक करावेसे वाटले. माझ्या तोंडून व्हा शाब्बास एवढे शब्द तिच्या साठी बाहेर पडले. इकडे आमच्या घरातील मुली बारावी शिकून पास होतात पण त्यांना एक दिवस घर सांभाळता येत नाही. *जीवन-शिक्षणाचे ज्ञान शाळेतील पुस्तकातून मिळत नाही तर ती परिस्थिती त्यांना शिकविते.*
शाळेचा परिसरातून बाहेर पडताना उद्या शालेय परिपाठ मध्ये त्या मुलीचा सत्कार करण्याचे ठरविलो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
या अश्या मुला-मुलींना शालेय पोषण आहार संजीवनी सारखे काम करते. याचा ही एक अनुभव आलाय ते पुढील वेळी पाहू.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद....!
आपले अनुभव आमच्याशी share करा. त्यासाठी
nasayeotikar.blogspot.com
येथे क्लिक करा.
*शब्दांकन :- नासा*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Comments
Post a Comment