गणिताची भीती घालविण्यासाठी उपक्रम
*मी लिहितो, तू सोडव*
वर्गातील मुले कंटाळवाणी झाली की अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत उत्साह येत नाही. मग त्या ठिकाणी काही तरी नाविन्यपूर्ण उपक्रमाची गरज भासते. अश्या उपक्रमातून मुलांना परत एकदा अध्ययनाकडे घेऊन जाता येऊ शकते. असाच काही नाविन्यपूर्ण उपक्रम इयत्ता तिसऱ्या वर्गात करण्यात आले ज्यामुळे मुले उत्साहाने यात सहभागी झाले आणि त्यांचा वेळ कधी संपला, शाळा कधी सुटली हे देखील त्यांना कळले नाही.
*कृती :-*
वर्गात भिंतीच्या खालच्या टोकाला काळ्या रंगाचा पेंट मारलेले आहे ज्यावर खडूने लिहिता येऊ शकते. त्याचा वापर करण्याची कल्पना डोक्यात आली. मग विद्यार्थ्याच्या प्रमाणात भिंतीवर रेषा मारून भाग पाडण्यात आले. त्या त्या भागावर विद्यार्थी भिंतीकडे तोंड करून बसविण्यात आले. सर्वप्रथम बेरीज क्रिया तेथे करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी प्रत्येकाने तीन अंकी दोन संख्या उभ्या पध्दतीमध्ये मांडणी करायची. बेरजेचे उदाहरण फक्त मांडणी करायची आहे सोडवायाचे नाही. उदाहरण मांडणी झाली की हात वर करायचे दूसरा कोणी हात वर केला की त्यांची जागा बदलायला लावायाचे. म्हणजे एकाच्या गणिताची मांडणी दुसऱ्याने सोडवायची. *मी लिहितो, तू सोडव.* गणित सोडविणे झाल्यावर आपल्या मुळ जागेवर जायचे. आपण लिहिलेले गणित दुसऱ्याने सोडविले आहे ते तपासयाचे आणि बरोबर असलेल्या उदाहरणावर टीक मार्क करायचे. ज्यांचे गणित चुकले असेल त्यांना काय चुकले आहे याची माहिती करून देऊन सर्व गणित बरोबर केलेल्या विद्यार्थ्याची सर्व मुलांसमोर टाळ्या वाजवून स्तुती करायची.
या उपक्रमाचे परिणाम खुप छान दिसून आले.
*उपक्रमाचे परिणाम :-*
मुले उत्साहात गणिताच्या क्रिया करू लागल्या. चूका होणार नाहीत याची काळजी घेऊ लागली. दुसऱ्याचे गणित तपासणी करण्याची सवय लागली त्यामुळे चूक बरोबर कळू लागले. गणित विषया बद्दल अभिरूची निर्माण झाली.
*शब्दांकन :- नासा येवतीकर, धर्माबाद*
Comments
Post a Comment