आम्हाला लागला पहा शाळेचा लळा
आज आहे आमची दप्तरमुक्त शाळा
ना पुस्तक आहे, ना आहे डस्टर
ना वही आहे, ना आहे दप्तर
सकाळीच मैदानात मुले झाली गोळा
आज आहे आमची दप्तरमुक्त शाळा
प्रार्थना म्हणायची अन गाणे म्हणायचे
पुस्तकातील कवितेवर ताल धरून नाचायचे
गाणे गाऊन मुलांचा छान झाला गळा
आज आहे आमची दप्तरमुक्त शाळा
मनावर नाही त्राण, नाही काही दडपण
आनंदाने उड्या मारण्यात रंगून जाईल मन
संपली वेळ आत्ता सर्व घराकडे पळा
आज आहे आमची दप्तरमुक्त शाळा
वाटते असावी रोज अशी दप्तरमुक्त शाळा
आम्हाला लागला पहा शाळेचा लळा
आज आहे आमची दप्तरमुक्त शाळा
- नासा येवतीकर, धर्माबाद
Comments
Post a Comment